छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे खरी- खोटी सिध्द करा : आ. शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखे याविषयी होत असलेल्या आरोप- प्रत्यारोपावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी वाघ नखा बाबत केलेला प्रश्न यामध्ये राजकारण आहे. नरेंद्र मोदी, सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून जी वाघ नखे लंडनमध्ये होती, ती भारतात येत आहेत. विरोधक म्हणतायेत ही वाघ नखे खरी आहेत का? तर माझा त्यांना उलट सवाल आहे ती खोटी आहेत का? हे सिद्ध करा अशा पद्धतीने ज्या गोष्टीं सोबत मराठी माणसाची अस्मिता जोडली गेलेली आहे. त्याचं विरोधकांनी राजकारण करू नका, असा सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला आहे.
साताऱ्यात छ. शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यात येणार
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येवून आदित्य ठाकरे यांनी वाघनखांच स्वागत, पूजन करावे, अशी मी विनंती करतो.छ. शिवाजी महाराज यांची वाघनखं साताऱ्यात आणण्यात येणार असून तेव्हा मिरवणूक काढली जाईल. यावेळी शिवतीर्थावर वाघनखं आणून त्याची विधीवत पूजा करण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराजांना हार अर्पण केला जाईल. शासन सुरक्षितेसाठी जिथे वाघनखं ठेवील, तेथेही सातारकर तसेच महाराष्ट्रातील लोकांनी येवून दर्शन घ्यावे, असे आवाहन छ. शिवेंद्रराजे यांनी साताऱ्यातून केले आहे.
सातारा जिल्ह्यात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिम
महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिम राबवावी असा कार्यक्रम सर्वांना दिला आहे. या पार्श्वभूीवर साताऱ्यातील शिवतीर्थावर छ. शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच शहरातील व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व शासकीय यंत्रणा यांनी आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला.