पुसेसावळीत पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले… पहा Video

सातारा | पूसेसावळी गावात सर्व व्यवहार सुरू आहेत. हे व्यवहार पूर्वी प्रमाणेच सुरू ठेवावेत. तसेच ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पुसेसावळी येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. पुसेसावळी येथील घटना दुर्दैवी आहे. ग्रामस्थांनी शांतता राखावी असे आवाहन करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्रशासनाने गावात सलोखा प्रस्थापित केला आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई होईल. तसेच कोणाही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नाही. निर्दोष व्यक्तींना नाहक त्रास होणार नाही, याची प्रशासन खबरदारी घेईल.
यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पुससावळी येथील घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रार्थनास्थळाची ही पहाणी केली.