कोयना, नवजाला जोरदार पाऊस : धरणात 24 तासात 10 हजार 694 क्युसेस पाणी
पाटण | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, कराड व पाटण तालुक्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. कोयना धरण क्षेत्रात यावर्षी पहिल्यांदाच 10 हजार 694 पाण्याची आवक गेल्या 24 तासात झाली आहे. त्यामुळे सध्या कोयना धरणात 25. 89 टक्के पाणीसाठी झाला आहे.
राज्यात मान्सून दाखल होवून महिना उलटला असला तरी सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या महिन्याभरात ऊन- वारा- पाऊसाचा खेळ सुरू असून पेरण्या अद्याप रखडलेल्या आहेत. पाटण, कराड, सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई या तालुक्यातील अनेक ठिकाणी 50 टक्केपर्यंत होत आल्या आहेत. अजूनही निम्म्याहून अधिक ठिकाणी पेरण्या रखडलेल्या आहेत. कोरेगाव, माण- खटाव, फलटण, खंडाळा याठिकाणी पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परंतु गेल्या दोन दिवसात कोयना धरणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
कोयना धरणात पावसाच जोर वाढला
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत कोयनानगर 63 व नवजाला 133 मिलिमीटर व महाबळेश्वरला 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी 2068′ 05″ फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा 25.89 टीएमसी झाला आहे.