रामकृष्ण वेताळ यांचा पुढाकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा
नागझरी, वळसे आणि उंब्रज शाळांमध्ये अन्नदानाचे वितरण

ओगलेवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पुढाकाराने नागझरी, वळसे आणि उंब्रज येथील शाळांमध्ये अन्नदानाचे वितरण करण्यात आले, तर मसूर आणि उंब्रज येथे महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांत माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, लोकसभा समन्वयक सुनील काटकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी मंडळ अध्यक्ष शंकरराव शेजवळ, सरचिटणीस संतोष कणसे आणि सोशल मीडिया अध्यक्ष रवींद्र लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कराड उत्तर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. यावेळी नागझरी (ता. कोरेगाव) येथील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन, एहसास मतिमंद मुलांची शाळा वळसे (ता. कराड) व जागृती माध्यमिक आश्रमशाळा उंब्रज (ता. कराड) येथील विद्यार्थ्यांसाठी अन्नदान करण्यात आले.
तसेच, मसूर व उंब्रज येथील रक्तदान शिबिरांत एकूण २०० पेक्षा जास्त पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या. या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी तुकाराम नलवडे, योगीराज सरकाळे, बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण,राज सोनवणे, दिपाली खोत, नवीन जगदाळे, जितेंद्र मोरे, बाळासाहेब पोळ, जयसिंग डांगे यांच्यासह सरचिटणीस शहाजी मोहिते, रघुनाथ शेडगे,सचिन नांगरे, भूषण शेजवळ तसेच कराड उत्तर मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व बुथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



