कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

उपमुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार : रणजिंतसिंह देशमुखांचा आ. गोंरेंना टोला

खटाव | माण-खटावची जनता व शेतकरी आंदोलन करत होते. त्याप्रसंगी येथील लोकप्रतिनिधी व स्वयंघोषित हवामान खात्याचे मंत्री परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करीत होते. माण-खटावच्या जनतेची अवहेलना झाली असून, नुसतेच फलक लावून तालुका जलमय होत नसतो. त्यासाठी जनमानसात येऊन परिस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक असते. जलनायक म्हणून बिरुद लावणाऱ्या लोकप्रतिनिधीचे पाण्याबाबत मोठे अपयशच म्हणावे लागेल. पीक विम्यातही माण-खटावला वगळले असून, उपमुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी केली.

निमसोड येथील शिवसृष्टी सभागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. देशमुख बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, राजूभाई मुलाणी, डॉ. महेश गुरव, उपसभापती विजयकुमार शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, अॅड. राजीव चव्हाण, राजेंद्र माने, ज्ञानेश्वर इंगवले, राहुल सजगणे, इम्रान बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रणजिंतसिंह देशमुख म्हणाले, माण- खटाव तालुक्यात खरीप हंगामात 21 दिवसांपेक्षा जादा पावसाचा खंड पडला, अशी परिस्थिती असताना ट्रिगर वन का लागू झाला नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्वयंघोषित जलनायक स्वतः म्हणवून घेतात. ती उपाधी दुष्काळ जाहीर झाला, तर धोक्यात येईल की काय म्हणून अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती व परिस्थितीबाबत दिशाभूल केली. यासाठी विविध आयुधांचा वापर पिण्याच्या पाण्याची तीव्रता लक्षात घेऊन कातरखटाव व दहिवडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. यामध्ये त्यांना अटकही झाली. कागदी घोडे नाचवत दोन्ही तालुक्यांतील जनतेची दिशाभूल केली असून, लवकरच याचा पर्दाफाश करणार आहे. दोन्ही तालुके दुष्काळी छायेत होरपळत असून, राज्य शासनाने या दोन्ही तालुक्यांत तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा गुराढोरांना सोबत घेत प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देऊ, असा इशाराही या वेळी देशमुख यांनी दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker