तत्काळ हटवा : कराड- तासगांव मार्गावरील स्पीड ब्रेकर विना परवाना आणि अनाधिकृतच
कराड | कराड- तासगांव मार्गावरील ते स्पीड ब्रेकर अनाधिकृतच असून ते तत्काळ हटवा, असा आदेशच पोलीस उपअधिक्षक यांना लेखी पत्राद्वारे देण्यात आला आहे. आपले कराड ग्रुपच्या पत्राचा संदर्भ देत हे खरमरीत पत्र उपविभागीय अभियंता कोल्हापूर यांनी लिहले असल्याने आता तरी स्पीड ब्रेकर हटणार का याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे.
कराड शहरातील पोलीस अधिक्षक व पोलीस संकुल यांच्या समोर चार स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. या स्पीड ब्रेकरमुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. अखेर सुज्ञ नागरिकांनी जाहीर फलक लावत हे गतिरोधक हटविण्याची मागणी केली. परंतु तरीही नागरिक व वाहन चालकांच्या मागणीकडे स्पीड ब्रेकर हटविण्याची जबाबदारी असणाऱ्यांनी तसेच शासकीय यंत्रणेने जाणूनबुझून दुर्लंक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक छोटे- छोटे अपघातही झाले.
नागरिकांच्या या मागणीकडे होणाऱ्या त्रासाकडे आपले कराड या ग्रुपच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पत्र दिले होते. संबधित बांधकाम विभाग यांनाही स्पीड ब्रेकर हटविण्याची मागणी केली होती. अखेर आज कोल्हापूरच्या उपविभागीय अभियंता पी. डी. शेडेकर यांनी एक पत्र पोलीस उपअधिक्षकांना दिले आहे. त्यामध्ये स्पीड ब्रेकर विना परवाना आणि अनाधिकृत बसविल्याचे म्हटले आहे. तेव्हा तत्काळ हटविण्याची सूचना केली आहे.