ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

उद्या 4 वाजता : कराड, खंडाळा व जावली तालुक्यातील कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत

सातारा | जिल्हातील “कोतवाल” संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मर्यादेत पदे भरणेबाबत सुधारीत कार्यक्रम देणेत आलेला आहे. त्यानुसार कराड, खंडाळा व जावली तालुक्यात कोतवाल या पदासाठी आरक्षण सोडत उद्या (दि.14) शुक्रवारी दुपारी 4 वाजता होणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या सोडतीच्या वेळेत बदल करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कराड तालुक्यातील पुढील 19 सजांमधील कोतवाल पदे रिक्त आहेत. 1. कालगांव, 2. कोपर्डे हवेली, 3. चिखली, 4. निगडी, 5. मरळी, 6. वसंतगड, 7. वारुंजी, 8. विंग, 9. शेरे, 10. काले, 11. पोतले 12. गोटे, 13. आटके, 14. आणे, 15. इंदोली, 16. किवळ, 17. मलकापुर, 18. वाघेरी व 19. साजुर. कराड येथील तहसील कार्यालयात सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच संबंधित ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.

जावली तालुक्यातील 16 पदे रिक्त असून मंजुर झालेल्या आरक्षणा नुसार मेढा, केळघर, करहर, आनेवाडी, कुडाळ, बामणोली मंडला अंतर्गत येणाऱ्या गावच्या कोतवाल पदासाठी जावली उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 1. बिभवी, 2. ढूंद, 3. केळघर, 4. आखाडे, 5. खर्शी, 6. बारामुरे, 7. काटवली, 8. कुडाळ, 9. हुमगाव, 10. सोमर्डी, 11. सायगाव, 12. सोनगाव, 13. आलेवाडी, 14. तेटली, 15. आपटी, 16. मुनावळे, कुसापूर या गावच्या रिक्त कोतवाल पदाचे आरक्षण शुक्रवारी 14/07/2023 रोजी दुपारी 3.00 वाजता पंचायत समिती जावली (मेढा) सभागृह येथे आयोजीत करणेत आल्याची माहिती जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिली आहे.

खंडाळा तालुक्यातील 7 ठिकाणी कोतवाल आरक्षण मंजूर असून 1. विंग, 2. राजेवाडी, 3.हरळी, 4.भोळी, 5.नायगाव, 6.वाठार बु. 7.खेड बु या गावांसाठी आरक्षण सोडत दि. 14 जुलै रोजी दुपारी 4 वाजता खंडाळा तहसील कार्यालयात असल्याची माहिती तहसिलदार अजित पाटील यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker