सातारा जिल्ह्यातील प्रकार : रिसाॅर्टमध्ये बारबालांवर पैसे उधळणाऱ्या 18 जणांवर गुन्हा

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
रात्री उशीरा पर्यंत एका रिसोर्ट मधील हॉलमध्ये बारबालांसोबत डान्स करणा-यांवर सातारा तालुका पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत रिसाॅर्ट मालक, मॅनेजर, वेटर्स आणि 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी 82 हजार 698 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातारा पोलिसांनी कास पठार रोडवर असलेल्या रिसाॅर्टवर मध्यरात्री 1 वाजता छापा टाकून कारवाई करण्यात असून यावेळी 6 बारबारलाही आढळून आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेट्री- कास (ता. जि. सातारा) येथील राज कास हिल रिसोर्ट नावचे हॉटेलमधील हॉलमध्ये काही तरुणांनी 6 महिला बारबालांना संगिताच्या तालावर नाचवले जात होते. उत्तान कपड्यात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करण्यात येत असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावून सातारा शहर पोलीसांनी राज कास हिल रिसोर्टमध्ये दिनांक शनिवारी मध्यरात्री 1 वा. चे सुमारास छापा टाकला. सदर रिसोर्टमधील हॉलमध्ये 6 बारवाला हॉलमध्ये असलेल्या एकुण 18 पुरुषांचे समोर आळीपाळीने येवुन उत्तान कपड्यात गिऱ्हाईकांच्या समोर उभ्या राहुन बिभत्स हावभाव करुन गिऱ्हाईकांचे जवळ जाऊन त्यांचेशी लगट करीत होत्या. सदर बारबालांच्या कृत्यावर गिऱ्हाईक हे आनंद घेऊन बारबालांवर नोटा उडवित होते. त्यावेळी राज कास हिल रिसोर्टचे मालक, मॅनेजर व बेटर्स हे पोलीसांची चाहुल लागताच सदर ठिकाणावरून पळुन गेले. हाॅलमध्ये बारबाला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या इसमांना पोलीसांनी जागीच ताब्यात घेतले. या कारवाईत मोबाईल हॅण्डसेट, जीबीएस कंपनीचा साऊंड सिस्टीम व डिस्को लाईट जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. दळवी करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे मार्गदर्शनानुसार तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलीस उप निरीक्षक डी. ए. दळवी, म. पो. उप निरीक्षक पाटील, पो. हवा. मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ, मो.ना. किरण जगताप, पो. कॉ. शंकर पाचांगणे, सातारा शहर पोलीस ठाणेकडील पो. हवा. निलेश यादव, पो. हवा. महांगडे, पो. कॉ. महांगडे यांनी सदर कारवाई केलेली आहे.



