मसूरला सेवानिवृत्त व गुणवंत शिक्षकांचा सत्कार
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूर (ता.कराड) येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा व गुणवंत शिक्षकांचा सत्कार माजी शिक्षण अर्थ व क्रीडा समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. संगिता साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ज्ञानदान करणं हे अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे. त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करायला मिळणं हे माझं भाग्य समजतो. विद्यार्थी आज घडविण्यासाठी एकमेव व्यक्ती सतत काम करते ती म्हणजे शिक्षक होय. यावेळी केंद्रप्रमुख श्रीमती नसीमा संदे, पात्र पदवीधर निवासराव पाटील, मुख्याध्यापक सुरेश साळवे, सौ.शोभा शिंदे, प्रदीप चंदनशिवे हाजराबी बागवान, छाया माने या शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
किवळचे माजी सरपंच सुनील साळुंखे, गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती महाबळेश्वरचे आनंद पळसे, संदीप संकपाळ, सौ. मुलाणी, दिगंबर कुर्लेकर, अशोक जगदाळे, संजय शेजवळ, विठ्ठल पवार, संपतराव जाधव, मनोज कांबळे,आनंदराव शेलार , नामदेव घोलप ,आमीन शिकलगार,सचिन कुंभार, लक्ष्मीकांत जाधव, मनोज कुलकर्णी,संजय सावंत व सर्व मसूर बिटचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.