दक्षिण तांबवे शाळेच्या शिक्षिका सिमा लावंड यांना रोटरी नेशन बिल्डर ॲवार्ड

कराड | रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने आदर्श शिक्षकांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात दक्षिण तांबवे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सिमा रमाकांत लावंड यांना सन 2023-2024 सालचा रोटरी नेशन बिल्डर ॲवार्ड देवून गाैरविण्यात आले. या कार्यक्रमास टी. बी. लुल्ला चँरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन किशोर लुल्ला, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी रिसर्च डायरेक्टर डॉ.भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे बद्रीनाथ धस्के, शिवराज माने, दत्ता कलबुर्गी, राहुल पुरोहित यांच्यासह रोटरी क्लब आँफ कराडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सिमा लावंड यांनी 14 वर्षे सेवा बजावली असून कोविड काळात ऑनलाईन शिक्षण तसेच “घरोघरी शाळा” प्रभावी उपक्रम अंमलबजावणी केली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सहभाग घेतला होता. ज्ञानरचनावाद, सहअध्यायी अध्यापन, गटकार्य, कृतीतून शिक्षण, शैक्षणिक साहित्य निर्मिती, अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर केला.
सिमा लावंड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, तांबवे केंद्राचे केंद्रप्रमुख निवास पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी, दक्षिण तांबवे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आबासो साठे, सहकारी शिक्षिका सौ. मनिषा साठे, श्री. सतिश सोनवणे यांनी अभिनंदन केले.