सह्याद्री साखर कारखाना निवडणूक : दोन दिग्गजांचे अर्ज बाद
कोपर्डे हवेलीत तरसाच्या कळपाचा हल्ला

कराड :- तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणूकीत अर्ज छाननी प्रक्रियेत विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे आणि काँग्रेसचे प्रमुख उमेदवार निवासराव थोरात या दोन दिग्गज उमेवारांचे अर्ज बाद करण्यात आले असून 21 जागांसाठी 205 इच्छुक उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
काँग्रेस तालुकाध्यक्ष निवास थोरात हे आयुक्तांकडे अर्ज दाखल करणार असल्याने त्यांच्या अर्जावर पुन्हा पुण्यातील आयुक्तांसमोर सुनावणी होईल. तसेच ज्या कारणासाठी त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. त्याची कागदपत्राचे पूर्तता झाल्याची माहिती समोर येत असल्याने निवास थोरात यांचा अर्ज वैद्य ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
कोपर्डे हवेलीत तरसाच्या कळपाचा हल्ला
कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे तरसाच्या कळपाने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 25 शेळ्यांचा तरसांनी फडशा पाडला. कोपर्डे हवेली येथील आमराई शिवारातील हा सर्व प्रकार असून एकाच शेतकऱ्याच्या 25 शेळ्यांचा ठार केल्याने शेतकऱ्यांचे दोन लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. पशुसंवर्धन विभाग तसेच वन विभागाकडून पाहणी घटनास्थळी पाणी करण्यात आली. विकास चव्हाण या शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर तरसानी हल्ला केला आहे.