कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराजकियराज्यसातारा

सह्याद्रीचा साखर कारखान्याचा पहिला हप्ता 3100 रुपये

मसूर प्रतिनिधी| गजानन गिरी
राज्यात सह्याद्री पॅटर्न म्हणून नावारुपास आलेल्या यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आज जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली. सर्वात प्रथम दर जाहीर करताना 3100 रुपयाचा पहिला हप्ता जाहीर केला. त्यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व सभासदांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सह्याद्री सहकारी साखर कारखाना नेहमीच ऊस उत्पादक सभासदांच्या पाठीशी ठामपणे राहिला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्यात नेहमीच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कोणताही गाजावाजा न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची पद्धत कारखान्याने जपली आहे. गेल्या एक महिन्यापासून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. तरीही कोणीही दर जाहीर केला नव्हता. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व सहकारी, खाजगी साखर कारखाने, शेतकरी संघटना व जिल्हा प्रशासन यांची बैठक आज सातारा येथे पार पडली. या बैठकीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी कारखान्याचा पहिला हप्ता 3100 रुपये सर्वात प्रथम जाहीर केला.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सन 2023- 24 च्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला पहिला हप्ता 3100 रुपये जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात प्रथम उसदर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांना ऊस उत्पादक सभासद धन्यवाद देत आहेत.

इतरांनी केले सह्याद्रीचे अनुकरण….
आजच्या बैठकीत सर्वात प्रथम सह्याद्रीने उसदराची कोंडी फोडली. सह्याद्री कारखान्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून इतर कारखान्यांनीही ३१०० रुपयांच्या आसपास दर जाहीर करत इतरांनी सह्याद्री कारखान्याचे अनुकरण केले अशी चर्चा सह्याद्री कारखान्याचा कार्यक्षेत्रात होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker