कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा
साकुर्डी सोसायटीच्या चेअरमन पदी तानाजी देवकर बिनविरोध
निवडणुक आणि पदाधिकारी निवडी बिनविरोध

कराड :- साकुर्डी येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी तानाजी देवकर तर व्हाईस चेअरमनपदी हणमंत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. साकुर्डी येथील विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्यात आली.
नवनिर्वाचित बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे :- महादेव धोंडीराम कदम, जगन्नाथ विष्णू कणसे, राजेंद्र मारुती कांबळे, बबन गोपाळा जाधव, निवास आनंद निकम, सुलोचना अधिकराव खांडे.
तानाजी देवकर म्हणाले, विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून चांगल्या पद्धतीचा पायंडा पडलेला आहे. यापुढे आम्ही सर्व संचालकांना सोबत घेऊन सोसायटीचे कामकाज पारदर्शक ठेवू. तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेऊ.



