ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Satara : कोरोनाने 1 रूग्णाचा मृत्यू तर 37 जणांना डिस्चार्ज

सातारा | कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात दिवसेंन दिवस वाढ होत होती. मात्र, आज आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 रूग्ण पाॅझिटीव्ह आले असल्याने दिलासा मिळाला आहे. तर 37 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

सातारा जिल्ह्यात 2023 सालात 3 रूग्णांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये आजच्या रिपोर्टमधील एकाची वाढ झाल्याने आजपर्यंत 4 रूग्णांंचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 35 रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 रूग्ण बाधित आढळून आलेत. तर 37 बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पाॅझिटीव्ह रेट हा 5.71 टक्के इतका आहे.

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा ः- जिल्हाधिकारी
राज्यात वाढत असलेल्या Seasonal Influenza आजार आणि कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. कोविड-19 व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेणेस त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. कोविड-19 विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खेाकणे हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. या आजाराचे अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेले तसेच, ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण होऊन गेलेली आहे (Post covid) अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी वेळोवळी व जेवणांपूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये आणि विशेष म्हणजे गरज नसतांना गर्दीचे व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker