सातारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट : अलमट्टी धरणात 120. 76 TMC पाणीसाठा
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. सकाळपासून कोयन धरण क्षेत्रात पावसाची संततधार आहे. गेल्या दोन- तीन दिवसात धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. गेल्या 24 तासात अवघे 0.97 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 80.67 टीएमसी पाणीसाठा आहे. अलमट्टी धरणात सध्या 120. 76 टीएमसी पाणीसाठा असून 42 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोयनेत 80. 67 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 80.67 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 13 मिलीमीटर, नवजा- 15 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 16 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 3073, नवजा- 4376 आणि महाबळेश्वरला- 4042 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 13 हजार 309 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
पूर नियंत्रण कक्ष सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक – 05/08/2023 8:00 am
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/10’3″
2) बहे पूल-(23.7)/6’6″
3) ताकारी पूल (46)/16’2″
4)भिलवडी पूल – (53)/13’10”
5)आयर्विन- (45)/12’9″
6)राजापूर बंधारा-(58)/28’1″
7) राजाराम बंधारा-(43)/28’09”
पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 12628
2) आयर्विन पूल – 16816
3) राजापूर बंधारा-65250
4) राजाराम बंधारा -27753
5) कोयना धरण-80.67 TMC/2100
6) वारणा धरण-28.90 TMC/6870
7)अलमट्टी धरण- 120.76TMC
आवक – 85751
जावक- 42000