पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले

पाटण | पाटण शहरासह तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोपडपले. आज मंगळवारी 4 वाजता अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडवली. गेल्या काही दिवसापासून उकाड्या हैराण असलेल्या लोकांना पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. तर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर कराड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी आभाळ आले मात्र, पावसाने हुलकावणी दिली.
पाटणला सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस वादळी पाऊस आला. काल झालेल्या पावसामुळे सुरूल येथे घराची भिंत कोसळल्याची घटना घडली होती. काही ठिकाणी घरावरील पत्रेही उडून गेले होते. आज पाटण शहरातील मुख्य बाजारपेठेत अवघ्या काही मिनिटे पडलेल्या पावसाने पाणी- पाणी केले. मात्र, शहरात कोणतेही नुकसान झाले नाही.
सद्या उन्हाळी भुईमूग काढण्याची सर्वत्र लागभग सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असल्याने घरी परतणाऱ्या नोकर वर्गाचेही हाल झाले. कराड शहरातील दत्त चाैकात एक दुकानाचा फलक चक्क विद्युत पुरवठा करणाऱ्या तारावर अडकला होता. तर काही बॅंनरही वादळी वाऱ्यामुळे फाटले. परंतु पाऊस काही बरसला नाही.