Satara News : सोशल मिडियावर ओळख अन् शाळेतील मुलीवर लाॅजवर अत्याचार
सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्याशी संबधित बातमी

सातारा | सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर साताऱ्यातील कॅफे, तसेच लॉजमध्ये अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संकेत मेंगणे (वय- 19, रा. मेंगणेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, हल्ली रा. शिक्रापूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात एक अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. इयत्ता नववीत शिकण्यास असलेल्या मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून संकेतशी ओळख झाली. सोशल मीडियावर दोघे एकमेकांशी सातत्याने संपर्क साधत होते. दोघातील संवाद होत असल्याने संकेत मेंगणे हा वारंवार साताऱ्यात येऊ लागला. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान फोटो आणि व्हिडिओ काढले होते. आपल्याकडील फोटो व व्हिडिअो व्हायरल करण्याची धमकी त्याने त्या अल्पवयीन मुलीला देण्यास सुरुवात केली.
संकेत मेंगणेने त्या मुलीस साताऱ्यातील एका लॉज, तसेच एका कॅफेत नेत अत्याचार केला. पीडित मुलीस मेंगणे वारंवार त्रास देवून लागल्याने तिने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजय पतंगे है करीत आहेत.