Satara News : जुगार मटका, चोरटी दारूविक्री करणाऱ्यांवर दोन वर्ष तडीपारची कारवाई
सातारा | जिल्ह्यामध्ये जावली, वाई तालुक्यातील जुगार मटका, चोरटी दारू विक्री सातत्याने गुन्हे कारणाऱ्या दोघांवर दोन वर्षासाठी तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख दिपक शामराव वारागडे (वय- 48 वर्षे, रा कुडाळ, ता जावली जि सातारा) व टोळी सदस्य महेश रामचंद्र जाधव (वय- 39 वर्षे, रा. कुडाळ, ता जावली जि. सातारा) यांच्यावर कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये अवैध जुगार मटका चालविणे, बेकायदा दारुची चोरटी विक्री करणेबाबत गुन्हे दाखल असल्याने भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली होती.
यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही. उलट त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते. तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.