क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

बस स्थानकातील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या शाहुपूरी पोलिसांनी आवळल्या

सातारा शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरीचे गुन्ह्यातील तीन संशयितांना 06 तासाच्या जेरबंद केले. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व सोनसाखळी, बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल व खिशातील रोख रक्कम असा एकुण 3 लाख 40 हजार 280/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रफिक युसुफ मुलाणी (वय- 31 वर्षे रा. पुष्करमंगल कार्यालय समोर भोसले चाळ, सातारा), आकाश सुधिर इंगवले (वय- 21 वर्षे, रा. 55 मेहर देशमुख कॉलनी- करंजे पेठ सातारा), ओयस आयाज खान (वय- 27 वर्षे, रा. 1 बुधवार पेठ- सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाणेस जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी सिकंदर जगन्नाथ पवार मुंबई ते इस्लामपुर असा बसने प्रवास करीत होते. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास सदरची बस ही सातारा बस स्टॅन्ड येथे जेवन करण्याकरीता थांबली असता. सदर फिर्यादी हे जेवण करण्यासाठी सातारा बस स्टँडच्या बाहेरील बाजूस आले असता, अचानक तीन अज्ञात इसमांनी फिर्यादी यांना हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल व खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतले. सदर घटनेबाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना गोपनिय माहितीद्वारे सदरील गुन्ह्यातील फिर्यादी यांना चायनिजच्या दुकानावर दोन संशयीत इसमांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल, सोन्याची चेन, अंगठी व रोख रक्कम जबरस्तीने काढुन घेतली आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने चायनिजच्या दुकानावर जावुन चौकशी केली असता चायनिज दुकानाचे मालक रफिक युसुफ मुलाणी यांनी सदरचा प्रकार पाहीला असुन आकाश इंगवले व ओयस खान या दोघांनी मारहान केली असलेबाबत सांगीतले. त्यानंतर दोन्ही संशयित सातारा बस स्टॅन्ड परिसरात फिरत असले बाबत समजल्याने सापळा रचुन ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, स. पो. फाैजदार ए. ए. बागवान, पो. हवा. सुरेश घोडके, पो. ना. निलेश काटकर, महेश बनकर, अभय सावळे, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे व सायबर शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker