आपला नेता भारीच : शंभूराज देसाईंनी कार्यकर्त्यांना घडवली मरळी ते मुंबई हवाई सफर

पाटण | राजकारणात अनेक नेते हेलिकॅप्टरने, विमानाने प्रवास करत असतात. मंत्र्यांनाही शासकीय दाैऱ्यासाठी अशी हवाई सफर करायला मिळत असते. परंतु कार्यकर्ता हा नेहमीच नेते येतात अन् जातात एवढेच पाहत असतो. परंतु नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी आणि कार्यकर्त्यांना जपणारे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी चक्क मरळी कारखाना (ता. पाटण) ते मुंबई अशी सफर घडवली.
उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे कार्यकर्त्यासाठी साहेब म्हणून परिचित आहेत. शंभूराज देसाई हे हवाई मार्गाने कामानिमित्त दाैलतनगर- मरळी येथे आले होते. परंतु हेलिकॅप्टर लगेच मुंबईला जाणार होते. अशावेळी साहेबांनी चक्क आपल्या तीन कार्यकर्त्यांना मरळीतून मुंबईला हेलिकॅप्टरने पाठवले. या तीन्हीही सामान्य घरातील कार्यकर्त्यांचा पहिलाच हवाई सफर असल्याने ते चांगलेच खूश झाले आहेत.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील राजेश दशवंत, नानासो साबळे (ढेबेवाडी), सागर नलवडे (कुठरे) हे स्वीयसहायक श्री. घाडगे यांच्यासोबत गेले होते. सध्या सोशल मिडियावर या हवाई सफर व्हायरल होत असून शंभूराज देसाई यांच्या या हटके अंदाजाची चर्चा सध्या पहायला मिळत आहे.