शंभूराज देसाई यांनी उध्दव ठाकरेंवर बोलू नये : हर्षद कदमांचा थेट इशारा
पाटण | उध्दव ठाकरे हे सिल्वर अोकवर शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यावरून उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी भेटीवर पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्यावर ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर बोलू नये, असा इशारा दिला आहे.
हर्षद कदम म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाईंनी गेली 25 वर्ष ज्या शिवसेनेत घालवली, त्याच्यांशी कधीही ईमाने- ईतबारे राहू शकले नाहीत. त्यामुळे लोटांगण घातले, स्वाभिमान घातले असले मोठे शब्द त्यांनी वापरू नयेत. मोठ्यामोठ्या शब्दाचा वापर करून टीका करणं ही भाषा तुम्हांला शोभत नाही. तेव्हा तुम्ही पक्षप्रमुखांच्यावर बोलू नये.
तेव्हा कुठे गेला होता स्वाभिमान?
महाविकास आघाडी सरकार आले तेव्हा आपणच शरद पवार साहेबांकडे लाॅंबिगसाठी गेला होता. कराडला यशंवतराव चव्हाण समाधीस्थळी अजित पवार हे आत्मक्लेश करण्यासाठी आले होते, तेव्हा पक्ष वेगळा असतानाही मांडीला मांडी लावून बसला होता. त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता. तुम्हाला शिवसेना उमगली नाही अन् उमगणारही नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या मतदार संघाकडे लक्ष दिलं तर बरं होईल, असा खोचक सल्लाही हर्षद कदम यांनी शंभूराज देसाईंना दिला.