तांबवे फाटा येथे जिल्हास्तरीय युनिफाईट 11 वी कराटे अजिंक्यपद स्पर्धा
युवा नेते व उद्योजक सुनील बामणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

कराड | युवा नेते व उद्योजक सुनील बामणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या युनिफाईट वेलफेअर असोसिएशन सातारा व श्रद्धा स्पोर्ट्स पश्चिम सुपने यांच्यावतीने 11वी जिल्हास्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हातील 325 खेळांडूनी सहभाग घेतला.
ताबंवे फाटा (ता. कराड) येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ नेते दादा सावंत यांचे हस्ते करण्यात आले. विजेत्यांना खेळांडूना युवा नेते व उद्योजक सुनील बामणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश शिंदे, कृष्णात चव्हाण, संदीप वाघमारे, अंकुश माने, अनु महापुरे, सानिका थोरात, विजय अवघडे, अविनाश गोंदळी, उदय गुरव तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होता.
यावेळी सुनील बामणे म्हणाले, महिला व मुलीच्या स्वः संरक्षणाच्या दृष्टीकोनातून कराटे येणे गरजेचे आहे. मुलांना व्यायामची आवड निर्माण होवून त्यांचे आरोग्य तंदुरुस्त झाले पाहिजे. आजची तरुण पिढी उद्याचे भविष्य आहे. आरोग्य संपदा जपणे ही मनुष्याच्या आयुष्यातील महत्वाची संपत्ती आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्तविक कराटे प्रशिक्षक अर्जुन कळंबे यांनी केले. आभार नितीन सर्यवंशी यांनी मानले.



