शरद पवारांचे घुमजाव म्हणाले… मी बोललोच नाही

सातारा | अजित पवार आमचे नेते असं मी म्हटलं नाही. सुप्रिया सुळे या त्यांच्या लहान बहिण आहेत, त्यामुळे त्या असं म्हटल्या असतील असे मी म्हणालो. पहाटेच्या शपथविधी अजित पवारांना संधी दिली होती. परंतु आता पुन्हा संधी दिली जाणार नाही आणि त्यांनी मागूही नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी आपल्या सकाळच्या वक्तव्यावर घुमजाव केल्याचे दिसत आहे.
दहिवडी (जि. सातारा) येथे पत्रकारांशी शरद पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. शरद पवार यांनी सकाळी बोलल्यानंतर राजकीय पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येवू लागल्या होत्या. तसेच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडून शरद पवार आता एनडीए सोबत येणार असल्याचे सांगितले जात होते. तर महाविकास आघाडीतील काॅंग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्याच्याकडून नाराजी व्यक्त केली जावू लागली होती. तसेच कार्यकर्त्याच्यातून नाराजी व्यक्त केली जात असून संभ्रम दूर करण्याची मागणी केली जात होती. या सर्व घडामोडीवर शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते.
शरद पवारांचे घुमजाव, म्हणाले
बारामती येथे पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते असून आमच्या पक्षात फूट नाही असं म्हटलं होतं. या प्रश्नावरून आता शरद पवार यांनी जोरदार उत्तर देत आता आमची भूमिका वेगळी असल्याचे म्हटले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला एकदा संधी द्यायची असते. वारंवार संधी द्यायची नसते. तसेच त्यांनीही पुन्हा संधी मागायचे नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आता अजित पवारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही आणि त्यांनीही संधी मागू नये, असे म्हटले आहे.