शिंदे आणि अजित पवार गट अडचणीत : कंत्राटी भरतीच्या जीआर बैठकीला होते ‘हे’ मंत्री

हॅलो न्यूज | राज्यात ठिकठिकाणी भाजपकडून महाविकास आघाडीचा निषेध नोंदवला जात आहे. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले असून महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर आरोप करत आहेत. भाजपाच्या आंदोलनात शरद पवार यांना टार्गेट केले जात असताना दिसत आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी 2011 आणि 2021 साली जीआर काढणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट अडचणीत आला आहे.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कंत्राटी भरतीचा जीआर 2021 साली निघाला तेव्हा कॅबिनेट बैठकीला सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे- पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, श्री. भुमरे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे आणि आदिती तटकरे उपस्थित होत्या.
तर 2011 च्या जीआर बैठकीला विजयकुमार गावित, राधाकृष्ण विखे- पाटील, अजित पवार नारायण राणे, दिलीप वळसे- पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या जीआरच्या कॅबिनेट बैठकीला हजर होते. तेव्हा आता भाजपाच्या लोकांनी यांचा राजीनामा घ्यावा, त्यास वैयक्तिक माझा सुप्रिया सुळे म्हणून तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल.
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री असताना काय केले?
कंत्राटी भरतीच काॅन्ट्रक्ट भारतीय जनता पक्षाच्या आमदारा मिळते. गेल्या 10 वर्षात देवेंद्र फडणवीस फुल टाईम मुख्यमंत्री होते तर आता पार्ट टाईम उपमुख्यमंत्री आहेत. तेव्हा या विषयात त्यांनी लक्ष घातले नाही.