अजित पवार नाॅटरिचेबल… बारामतीचे पिंगळे फार फेमस : सत्तासंघर्षावर शिंदे गटाचे आमदार म्हणाले

सातारा | अजित पवार नाॅटरिचेबल आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाच्यापुढे पक्ष टिकविण्याचे आव्हान आहे. पिंगळे पहाटे 5 वाजता येतात आणि 7 वाजेपर्यंत फिरतात. त्याच्या हातात कंदील असतो आणि तेच भविष्य सांगत फिरतात. तेव्हा बारामतीचे पिंगळे फार फेमस, अलीकडे बारामतीच्या पिंगळ्याचे काम त्याचे चेले आज करतात. आता केवळ कंदील घेवून फिरायचे राहिले आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर आ. महेश शिंदे यांनी केली.
कोरेगाव मतदार संघातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आ. महेश शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, आज सत्तासंघर्षाचा निकाल आहे, सगळ्याचे लक्ष तिकडे आहे. पण आम्हांला काही मानसिक ताण- तणाव नाही. कारण आम्ही जनतेतं राहणारे लोक आहोत. त्यामुळे न्याय व्यवस्था त्याचं ती काम करेल. न्यायालयाचा निर्णय आम्हांला मान्य असेल स्पष्ट केले.
विरोधकांना पक्ष टिकविण्याचे आव्हान
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचंड काम करत आहेत, त्याच्या विरोधात वेगवेगळ्य आवळ्या उटवल्या जात आहेत. मंत्रिमंडळ कोणत्याही टेन्शनमध्ये नाही. कुणालाही ताण नाही, विरोधी पक्षांना कोणतेही आता काही काम राहिले नाही. विरोधकांना पक्ष टिकविण्याचे आव्हान आहे, अशी टीकाही राष्ट्रवादीवर आ. महेश शिंदे यांनी केली.