कराडला शिवांजली ज्वेलर्स आयोजित अधिक श्रावणमास महोत्सव

कराड | महाराष्ट्राची संस्कृती ही सणा समारंभात सामावलेली संस्कृती आहे. इथे प्रत्येक सणाला आणि सण घेऊन येणाऱ्या प्रत्येक महिन्यांला आपल्या महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी पंचांगपद्धतीनुसार अधिकमास तीन वर्षांनी येत असला तरी तो यावर्षी तब्बल १८ वर्षांनी अधिक मास श्रावण महिन्यात आल्याने अध्यात्मिक परंपरा जपत शिवांजली ज्वेलर्सतर्फे अधिक श्रावण मास महोतस्वाचे आयोजन करण्यात आले. दि. १८ जुलै २०२३ पासून सुरु झालेला हा महोत्सव १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. महोत्सवात अनेकोनेक आकर्षणांचा वर्षाव असून शिवांजली ज्वेलर्सने संस्कृती आणि परंपरांची एक वेगळीच गुंफण या महोत्सावाच्या निमित्ताने केल्याचे दिसून येते.
अधिकश्रावण मास महोत्सवात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन
दि. २३ जुलै २०२३ रोजी शिवांजली ज्वेलर्सतर्फे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कराड, सातारा भागातील अनेक महिलांनी या हळदीकुंकी समारंभात सहभाग घेत शिवांजली ज्वेलर्सच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१९९९/- रुपयांच्या पुढील चांदी खरेदीवर आकर्षक भेटवस्तू
शिवांजली ज्वेलर्स आयोजित अधिक श्रावण मास महोत्सवात विविध आकर्षणांचा सहभागी ग्राहकांनी लाभ घेतला असून. १९९९/- रुपयांच्या पुढील चांदी खरेदीवर प्रत्येक ग्राहकास आकर्षक भेटवस्तू शिवांजली ज्वेलर्सतर्फे देण्यात आल्या. अधिक मास म्हणजे जावई पूजनाचा सण आपल्या संस्कृतीत सांगण्यात आला आहे. या जावईपुजनावेळी जावयाला द्यायच्या चांदीच्या वस्तूंची खरेदी करत अनेक ग्राहकांनी शिवांजली ज्वेलर्सला भेट दिली आणि आकर्षक भेटवस्तू मिळाल्याने ग्राहक समाधानाने घरी परतले. तसेच अधिकमासात जोडवी खरेदी करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रियन संस्कृतित सांगण्यात आली आहे. यावेळी अनेक सौभाग्यवतींनी जोडवी, पैंजण खरेदी करीत अधिकमास मोहत्सवात सहभाग नोंदवला आणि आकर्षक भेटवस्तू देखील मिळविल्या.सुवर्ण संचय योजनेत (भिशी) सहभागी होणाऱ्या प्रत्येक नवीन सभासदास हमखास आकर्षक भेटवस्तू शिवांजली ज्वेलर्स तर्फे सुवर्ण संचय योजना राबविण्यात येते. जे ग्राहक या सुवर्ण संचय योजनेचे नव्याने सभासद झाले त्यांना शिवांजली ज्वेलर्सतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
गुरूवार १७ ऑगस्टपासून श्रावण महिन्यासाठी सोन्या- चांदीचे दागिने
शिवांजली ज्वेलर्स आयोजित अधिक श्रावण मास महोत्सवात आतापर्यंत असंख्य ग्राहकांनी भेट दिली असून या महोत्सवाला शोभा आणली आहे. हा महोत्साव दि. १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरु राहणार असून जास्तीत जास्त ग्राहकांनी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या योजना आणि आकर्षक भेटवस्तूंचा जरुर लाभ घ्यावा, दि. १७ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु होत आहे. यावेळी सणांना सुरुवात होते, घरात लागणाऱ्या चांदीच्या वस्तू, सोन्याचे दागिने या प्रत्येक खरेदीसाठी तुम्ही शिवांजली ज्वेलर्सला भेट देऊ शकता. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी ग्राहकांनी या महोत्सवानिमित्त करावी आणि महोत्सवातील आकर्षक भेटवस्तूंचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवांजली ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.