कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात एआरटी सेंटरमध्ये सामाजिक संरक्षण शिबिर
कराड ः- सामाजिक संरक्षण शिबिर उपजिल्हा रुग्णालय कराड येथे सामाजिक संरक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या सामाजिक संरक्षण शिबिरामध्ये 125 रुग्ण उपस्थित होते. यापैकी 40 लाभार्थ्यांना एसटी पास देण्यात आले व संजय गांधी प्रकरणे देण्यात आली.
सामाजिक संरक्षण शिबिर एआरटी सेंटर उपजिल्हा रुग्णालय कराड येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन एआरटी सेंटर मधील समुपदेशक पितांबर ठोंबरे, डाटा मॅनेजर नवनाथ हेंद्रे तसेच सर्व एआरटी स्टाफनी आणि विहान संस्थेच्या सर्व स्टाफ यांच्या मदतीने केले. या कार्यक्रमासाठीचे मार्गदर्शन एआरटीच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता यादव यांनी केले. या कार्यक्रमासाठी तहसील विभागातील संजय गांधी निराधार योजनेतील वरिष्ठ लिपिक हेमंत धुमाळ, आगार विभागातील वाहतूक अपघात विभागाचे अनिल सावंत, वाहतूक निरीक्षक वैभव साळुंखे, अँडव्हकेट नितीन पाटील, अँडव्हकेट एस. बी. शिंदे, एआरटीचे नोडल अधिकारी व प्रभारी श्री. देसाई, जिल्हा पर्यवेक्षक पुंडलिक पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. आतार, डॉ. वसीमा अन्सारी, आयसीटीसीचे समुपदेशक महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक धनश्री पाटील यांनी केले. समुपदेशक श्रीमती सोनाली माने यांनी प्रस्ताविक केले. संजय गांधी विभागाचे वरिष्ठ लिपिक श्री हेमंत धुमाळ यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अँड. नितीन पाटील यांनी एचआयव्ही रुग्णाविषयी असणारे कायदे याबद्दल माहिती सांगितले. विहान प्रकल्प समन्वयक कुमारी काजल शिंदे यांनी लाभार्थ्यांना योजनांची माहिती दिली. श्रीमती स्मिता शिंदे यांनी आभार मानले. सामाजिक संरक्षण शिबिराचे आयोजन एआरटी स्टाफ व विहान स्टाफ यांनी केले.