श्रीनिवास फाउंडेशनचा कृषीलक्ष्मी पुरस्कार : मसूरच्या सौ. वनिता बर्गेना जाहीर

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
सातारच्या श्रीनिवास फाउंडेशन व युवा 360 कृषीलक्ष्मी यांच्यातर्फे सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. कर्तुत्वाचा सन्मान म्हणून कृषीलक्ष्मी पुरस्कार मसूरच्या सामाजिक कार्यकर्त्या व माजी ग्रामपंचायत सदस्या वनिता दिनकर बर्गे यांना जाहीर करण्यात आला.
कार्यक्षम सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सौ वनिता बर्गे यांची ओळख आहे. मसूर ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी राहिली आहे. आत्माकृषी अंतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या बचत गटाबरोबरच अनेक महिला बचत गट निर्माण केले. बचतगटांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले. त्यातून महिलांचे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवले. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून अनेक स्पर्धा भरवून त्यांनी सहकार्य केले. सध्या त्या कराड महिला मर्चंट शाखेच्या सल्लागार म्हणून कार्यरत असून मसूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, शेती, क्रीडा, कृषी क्षेत्रात सुद्धा त्यांचे चांगले योगदान राहिले आहे. त्यांच्या विविध सार्वजनिक कार्याची दखल घेऊन श्रीनिवास फाउंडेशनच्यावतीने कृषी लक्ष्मी पुरस्कार सौ वनिता बर्गे यांना मिळाला आहे.
या निवडीबद्दल सौ बर्गे यांचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक लहुराज जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम दीक्षित, प्रा कादर पिरजादे, नितीन जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, वामनराव शिरतोडे, बाळकृष्ण गुरव, किशोर जगदाळे, संजय जाधव, संभाजी बर्गे, गजानन गिरी, प्रल्हाद बर्गे, बाबासाहेब भांडवले, दत्तात्रय नलवडे, अमर बर्गे, अशोक निकम, अमोल काशीद, रमेश ओसवाल यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.