चोरटी वाळू वाहतूक : औंध पोलिसांनी 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
पुसेसावळी । खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे अवैध चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर औंध पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत डंपर व 4 ब्रास वाळू असा एकूण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रमेश नारायण जाधव (वय- 23, रा. गुरसाळे) या संशयितास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेसावळी येथील दत्त चौकातुन रमेश जाधव हा पिवळा रंगाचा डंपर मधून बेकायदा बिगरपरवाना अवैधरित्या डंपरमधुन घेवून जात होता. अंदाजे 60 हजार रुपयांची सुमारे 4 ब्रास वाळुची चोरटी वाहतुक करीत असताना मिळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल किरण नामदेव हिरवे यांनी औंध पोलीस ठाणेस दिली असून गुन्ह्यातील आरोपी रमेश जाधव यास अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांचे मार्गदर्शनाखाली अश्वीनी शेंडगे, औंध पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे, पो.हवा आर. पी. कांबळे, पो.ना.आर एस बनसोडे,पो कॉ. के एन हिरवे पो.कॉ.एम आर जाधव, यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.