कराडला तळबीड, आष्टा, विटा पोलिस हद्दीतील चोरीच्या मोटार सायकली सापडल्या

कराड | शहर पोलिस पेट्रोलींग करत असताना दोन युवक मोटार सायकलवरून संशयितरित्या फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता त्यांनी दुचाकीची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. कराड, तळबीड व सांगली जिल्ह्यातील आष्टा आणि विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 6 चोरलेल्या मोटार सायकली हस्तगत करण्यात कराड शहर पोलिसाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यात सुनिल ताराचंद चव्हाण (वय- 20, रा. उत्तर पार्ले, ता. कराड) व अमोल रूपचंद चव्हाण (वय- 26, रा. वारूंजी, ता. कराड) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलिस पेट्रोलिंग व नाकाबंदी करून मोटार सायकल चोरीचा तपास करत होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे यांचेसह पोलीस पथक कराड शहरात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान, दोन इसम संशयितरित्या मोटार सायकलवरून फिरत असताना आढळून आले. तेव्हा त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलीस ठाण्यात घेवून आले असता त्याचेकडे विश्वसात घेवून विचारपुस केली असता. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली दुचाकी गाडी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी इतर 5 मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. त्यापैकी 4 मोटार सायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. चोरीच्या गाड्या या तळबीड- 1, कराड शहर- 2, आष्टा- सांगली- 1, विटा- सांगली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील – 1 असल्याची माहिती समोर आली आहे. इतर दोन मोटार सायकल बाबत माहिती घेणे सुरू असून अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक रघुवीर देसाई हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सफाै. रघुवीर देसाई, पोलीस नाईक संजय जाधव, किशोर तारळकर, आनंदा जाधव, महेश शिंदे, रईस सय्यद, अमोल देशमुख, सोनाली मोहिते यांनी केलेली आहे.