कराड शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करा : पोलिस प्रमुखांना निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहर व कराड तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने चालु आहेत. अवैध बेकायदेशीर मटका व्यवसाय, जुगार अड्डे क्लब, आॅनलाईन लाॅटरी यासारखे सर्व काळे धंदे बंद करण्यात यावेत. तसेच धंदे करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी सातारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर ऊर्फ आबासाहेब वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परजिल्हात ज्याप्रमाणे अवैध व्यावसायिकांवर महाराष्ट्र संघटीत आर्थिक गुन्हेगारी नियत्रंण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई झाली. तशीच कारवाई, कराड परिसरातील अवैध धंदे,विशेषतः मटका व्यवसायिकांवर व्हावी. यासाठी निवेदन दिले.
कराड शहर व तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई न झाल्यास दिनांक 15 मे 2023 पासून,तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांना देण्यात आल्याची माहिती जालिंदर ऊर्फ आबासाहेब वाघमारे यांनी दिली आहे.



