क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

नांदलापूर फाट्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात : दोघे गंभीर जखमी

कराड | पुणे- बेंगलोर महामार्गावर जखिणवाडी फाटा येथे चार वाहनाच्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठिमागून धडक दिल्याने पडलेल्या दुचाकी स्वारांना वाचवण्याच्या प्रयत्नात जीप जनरेटर व्हॅनला धडकून नाल्यात पलटी झाली. या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. सतीश पांडुरंग सातुरे (वय- ४६) व राजेंद्र लक्ष्मण पाडळे (वय- ५० दोघेही रा. भोईगल्ली, कराड) अशी अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतीश सातुरे हे दुचाकी (क्रमांक एमएच- 11 जे- 9099) वरून कोल्हापूर बाजूकडून कराडाकडे जात होते. नांदलापूर (जखिणवाडी) फाटा मळाईदेवी पतसंस्थेच्या समोरून बैलबाजार मार्गे जाण्यासाठी महामार्ग ओलांडताना दुचाकी थांबवली. या दरम्यान पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक झाली. धडक होताच दुचाकीसह दोघेही रस्त्यावर पडले. नेमके त्याचवेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या पिकआप जीपच्या (क्रमांक एमएच- 12 ईएफ- 4060) चालकाने समोरच पडलेल्या दुचाकीस्वारांना वाचवण्यासाठी भरधाव वेगात गाडी कोल्हापूर-पुणे लेनवर वळवली. त्याचवेळी कोल्हापूरकडून पुणे बाजूला जाणाऱ्या जनरेटर व्हॅन (क्रमांक एमएच- 12 एफसी- 7243) ला धडक देऊन पुलावरून खाली नाल्यात पलटी झाली.

या आपघातात दुचाकी स्वारांच्या पायावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच डिपीजेन कंपनीचे इंन्चार्ज दस्तगीर आगा, महामार्ग क्रेन सर्व्हिसचे सुनिल कदम, राहुल कदम, शुभम शिंदे, विशाल तुपे हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. आपघाताची मिहिती कराड शहर पोलिस व महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच आपघात विभागाचे हवालदार धिरज चतूर यांच्यासह कर्मचारी अपघातस्थळी आले. जखामींना रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker