मलकापूरचे विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकले : चाैघांची निवड

कराड ः- मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरच्या विद्यार्थ्यांनी सातारा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारामध्ये घवघवीत यश मिळविले. तर चाैघांची विभाग स्तरावर निवड झाली.
जिल्हास्तरावर चमकलेले विद्यार्थी ः- रब्बना शहानवाज मुल्ला (75 किलो वजन गट)- जिल्हास्तर प्रथम क्रमांक, अथर्व संतोष पवार (51 किलो वजन गट) जिल्हास्तर प्रथम क्रमांक. गौरव गणेश गायकवाड (96 किलो वजन गट )- जिल्हास्तर प्रथम क्रमांक. रोहन गणेश परिहार- जिल्हास्तर प्रथम क्रमांक, हर्षद जाधव व सूरज गौड द्वितीय क्रमांक. आदित्य पवार तृतीय क्रमांक पटकावून पुढे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडू व पालकांचा सत्कार विद्यालयात करण्यात आला.
सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात, मुदस्सर मोमीन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरूणा कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक बी. जी. बुरुंगले, कॉलेज विभाग प्रमुख एस. डी. पाटील, क्रीडाविभाग प्रमुख जे. एन. कराळे, मार्गदर्शक शिक्षक डी. व्ही. कवळे, एस. टी. कांबळे, पालकवर्ग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. के. राठोड यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात यांनी मानले.