कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या आंदोलनाला यश : अखेर हणबरवाडी- शहापूर योजनेचे पाणी सोडले

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूरसह परिसरातील 16 गावांना वरदान ठरणाऱ्या हणबरवाडी – शहापूर उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी सोडले. पाण्यासाठी 18 ऑगस्टला मसूरला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार व आश्वासनानुसार रस्ता रोको मागे घेण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत 21 ऑगस्ट रोजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मसूरच्या पूर्वेकडील गावात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्‍याची पालकमंत्र्यांना जाणीव करून दिली व दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती केली. अखेर आज पाणी विभागातल्या गावच्या शिवारात दाखल झाले. या योजनेच्या पाण्याचे 15 दिवस चालू व 8 दिवस बंद असे आवर्तन राहणार आहे. आमदार श्री. पाटील यांनी माळवाडीच्या पंपग्रह, वितरण नलिकेची पाहणी आज केली.

या योजनेमुळे कराड तालुक्यातील अंतवडी, रिसवड, मसूर (यादववाडी, माळवाडी) वाघेरी (मेरवेवाडी), वडोली निळेश्वर, शहापूर, करवडी, राजमाची, वनवासमाची, चिखली, किवळ व खोडजाईवाडी आदी 12 गावांमधील 2600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 900 मिमी व्यासाच्या पाईपलाईनद्वारे 3300 मि. लांबी 80 मि उंचीवर 495 एच.पी च्या 4 पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. या योजनेची सध्याची किंमत 101.40 कोटी इतकी आहे. या योजनेमध्ये उजवी बाजू गुरुत्वनलिका 25.54 किमी व डावी बाजू 22.27 किमी पाईपलाईनद्वारे व लघू वितरका पाईपलाईन सुमारे 59 किमीद्वारे शिवारात पाणी फिरणार आहे.

यावेळी माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, लालासाहेब पाटील, डॉ. विजय साळुंखे, शिवाजी साळुंखे, सुनील साळुंखे, पंकज दीक्षित, विजयसिंह जगदाळे, कादर पिरजादे, प्रमोद चव्हाण, सौ. उज्वला साळुंखे, युवराज शिंदे, बापूराव शिंदे, त्रिंबक शिंदे, कैलास शिंदे, संभाजी शिंदे, संभाजी इंगवले, सागर इंगवले, पिंटू पाटील, कन्हेर कालवा उपविभाग क्र.2 चे सहाय्यक अभियंता गणेश इंगोळकर, करवडी क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता आर. व्ही. घनवट, शाखा अभियंता एस. बी. यादव, कृष्णा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रगती यादव, उपअभियंता यु. व्ही. नांगरे, उपअभियंता यांत्रिकी विभाग विजय पाटील, शाखा अभियंता धुमाळ मॅडम शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरावेत आ. बाळासाहेब पाटील
हणबरवाडी शहापूर योजनेचे पाणी सुरू झाले असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपापले पाणी मागणी अर्ज जलसंपदा विभागाच्या मसूर कार्यालयात भरावेत, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker