राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा जामीन
मुंबई | राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 2 महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने तब्येत ठिक नसल्यामुळे हा जामीन देण्यात आला आहे. नवाब मलिकांना 1 वर्ष 5 महिन्यांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला. फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक जेलमध्ये होते. हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, ते फेटाळली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने हा जामीन 2 महिन्यासाठी मंजूर केला आहे.
[BREAKING] Supreme Court grants temporary medical bail to NCP's Nawab Malik for two months
report by @DebayonRoy https://t.co/hkBJkzCa3M
— Bar & Bench (@barandbench) August 11, 2023
नवाब मलिकांचा अभिमान आहे : विजय वड्डेटीवार
पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातील लोकांना नवाब मलिकांचा अभिमान आहे. त्याच्यावरील आरोप झालेले कल्पित असून रचलेले गेलेले षडयंत्र आहे. या सर्वामधून ते बाहेर पडतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार व्यक्त केला.