यात्रेला गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरात शेजारी महिलेने मारला डल्ला

सातारा | शहरातील एका अपार्टमेंट मधील बंद घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने व रोकड चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात शाहूपुरी पोलिसांनायश आले आहे. संशयीत शेजारी महिला व सहभागी सोनाराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सायली प्रणव पवार (रा. गुरूज्योती अपार्टमेंट, रामचा गोट,सातारा) व सहभागी सोनार प्रशांत विष्णू गिड्डे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत (दि.10 एप्रिल 2023 रोजी) गुरूज्योती अपार्टमेंट, रामचा गोट, सातारा येथील कुटुंब यात्रेनिमीत्त घर बंद करुन चावी शेजारी ठेवुन गावी गेले होते. तेव्हा बंद घरामधील कपाटामध्ये ठेवलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 16,000/- रु,ची रोख रक्कम चोरीस गेले बाबत शाहुपूरी पोलीस ठाणेत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत माने हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लैलेश फडतरे, चंद्रकांत माने, सचिन माने, हसन तडवी, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल पवार, स्वप्निल सावंत तसेच माहिला अंमलदार माधुरी शिंदे, शुभांगी भोसले, कोमल पवार, तनुजा शेख यांनी केली आहे.