क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराज्यसातारा

सातारा भरारी पथकाचा दणका : हाॅटेल- ढाब्यावर विनापरवाना दारू पिणाऱ्या 80 ग्राहकांवर कारवाई

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
हाॅटेलला बिअरबारचा परवाना नसताना दारू पिणाऱ्या 10 ग्राहकांना चांगलाच दणका राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा भरारी पथकाने दिला आहे. रात्री 9.30 वाजता हाॅटेल धनश्रीवर टाकलेल्या या धाडीत हाॅटेल मालकासह वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील 10 जणांवर कारवाई करत गुन्ह्यात संशयितांच्या ताब्यातून टेबले, खुर्च्या, विविध बँडच्या विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6, 585/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यात 10 हाॅटेल आणि ढाब्यावर धाडी टाकत 80 जणांवर कारवाई केली असल्याचे सांगितले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, शहाबाग फाटा (ता. वाई) गावचे हद्दीत वाई- सुरुर रस्त्यावर असलेल्या हॉटेल धनश्री येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा भरारी पथकाने रात्री 09.30 च्या सुमारास अचानक धाड टाकली. यामध्ये हॉटेल चालक तानाजी बापू गायकवाड (रा. शहाबाग, ता. वाई) याच्याकडे शासनाचा अधिकृत मद्यविक्री परमिटरुम बिअरबार परवाना नसताना ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. बिअरबारचा परवाना नसताना हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्या 1) श्रेयस सुभाष सावंत (वय 26 वर्षे, रा.साकीनाका पोलीस लाईन, मुंबई), 2 ) दत्तात्रय आनंदा वाडकर (वय- 31 वर्षे), 3) दिग्विजय शांताराम वाडकर (वय- 23 वर्षे), 4) अभिषेक अशोक गायकवाड (वय- 21 वर्षे), 5) वैभव लक्ष्मण वाडकर (वय- 29 वर्षे), 6) मयुर महादेव वाडकर (वय- 24 वर्षे, सर्वजण रा. वयगांव, ता. वाई), 7) ओमकार सुरेश दुधाणे (वय- 24 वर्षे), 8) राहुल उर्फ आशिष सुभाष दुधाणे (वय- 24 वर्षे), 9) सुमित भरत दुधाने (वय- 28 वर्षे), 10) अमर संतोष दुधाने (वय- 26 वर्षे, सर्वजण रा. खिंगर, ता. महाबळेश्वर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, सोमनाथ माने, सहा. दु. निरीक्षक महेश मोहिते, जवान सागर आवळे, अरुण जाधव, आबासाहेब जानकर यांनी सहभाग घेतला.

परवान्याशिवाय दारू पिण्यास बसल्यास कारवाई होणार : किर्ती शेडगे
मागील दोन महिन्यात या विभागाकडून जिल्ह्यातील एकूण 10हॉटेल/ धाब्यांवर छापे टाकून 80 जणांविरुदध कारवाई करण्यात आली. वाई शहरालगत शहाबाग फाट्यावरील हॉटेल धनश्री येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल मालक व विना परवाना पिणा-यांकडून एकूण 1 लाख 14 हजारांचा दंड वसूल केला. जिल्हयातील हॉटेल, ढाबे व खानावळी मालक/चालक यांना आवाहन करण्यात येते की, शासनाच्या मद्यविक्री परवाना शिवाय ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था करुन देवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क, सातारा अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker