कराडचे नवे DYSP अमोल ठाकूर उभारणार स्पर्धा परिक्षेची चळवळ

कराड | विशाल वामनराव पाटील
विद्येचे माहेर घर असलेल्या विद्यानगर- कराड परिसरात शहरासह ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. यामुळेच पहिल पोस्टींग कराड घेतलेले पोलीस अधिकारी आता स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक चळवळ उभारणार आहेत. आज MPSC- UPSC मधून शेकडो अधिकारी घडविणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.. DYSP अमोल ठाकूर.
अमोल ठाकूर म्हणाले, कराड शहराला गुन्हेगारी तसेच सामाजिक सलोखा राखण्याची परंपरा आहे. येथील लोक आणि प्रामुख्याने राजकीय लोकप्रतिनिधी यांची सामजस्यंता वेळोवेळी दिसते. माझे मूळ गाव गारगोटी (जि. कोल्हापूर) तर पुण्यात शिक्षण घेतले अन् शेकडो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेतून घडविले. त्यामुळे कोल्हापूर- पुण्याची अोढ असताना कराड हे बेस्ट ठिकाण असल्याचे पाहिले आहे. त्यामुळेच गडचिरोलीनंतर पहिले पोस्टींग कराड निवडले आहे. ते बीडीअो आणि तहसिलदार पदाची परिक्षाही पास झालेले होते.
सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख यांनी उंच भरारी योजनेच्या माध्यमातून एक नवा उपक्रम हाती घेतलेला आहे. आता त्याच पध्दतीने कराडचे DYSP अमोल ठाकूर हे स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. केवळ मार्गदर्शकच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकला पाहिजे. यासाठी चळवळ उभारणार आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुक गावाची अोळख कराडकरांना मिळविण्यासाठी नामी संधी मिळाली आहे. कारण उपळाई बुद्रुक हे अधिकाऱ्याचे गाव म्हणून अोळखले जाते. कराडचे तत्कालीन तहसिलदार अमरदीप वाकडे याचे हे गाव आहे.