नोकरी 10 वी पास : पोस्टात सेवक पदाच्या 12 हजार 828 जागांवर होणार भरती

हॅलो न्यूज (नोकरी संदर्भ) | महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक विभागात 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांकरिता सेवक पदांच्या सुमारे 12 हजार 828 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 11 जून 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महाराष्ट्र टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पद भरली जाणार आहेत. यासाठी 10 वी पास ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वय 18 ते 40 अशी कमाल वयोमर्यादेत सवलत सवलत दिली जाईल. शाखा पोस्ट मास्टर पदासाठी 12 हजार ते 29 हजार 380/- दरमहा पगार असणार आहे. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक विभागात 10 हजार ते 24 हजार 470 रूपये पगार असणार आहे.
क्लिक करा लिंक ः- https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुण/ श्रेणी/ गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रूपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.