सातारा, कराड व फलटणच्या भरारी पथकाची बेकायदेशीर दारू अड्ड्यावर छापा : साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा | राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने बनावट दारु तयार करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड व फलटण विभागाने आज आरफळ (ता. जि. सातारा) गावचे हद्दीत साताराकडून लोणंदच्या दिशेने जाणारी बेकायदेशीर मद्याकांची (स्पिरीट) वाहतूक पकडली. पुढील तपासात ढाकाळे (ता. बारामती जि. पुणे) व भावेनगर- पिपोंडे (ता. कोरेगांव, जि. सातारा) येथे छापा टाकून बेकायदा बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे 1500 लिटर स्पिरीट (मद्यार्क), 90 बाटल्या बनावट देशीदारू, कॅप सिलींग मशीन, दोन चारचाकी वाहने, तीन मोबाईल संच तसेच बनावट देशीदारू तयार करण्याकरिता लागणारे इतर साहित्य असा एकूण रुपये 7, 36, 500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरील गुन्ह्यात 1) खुशाल बाळासो गोफणे (रा. सोनगाव, ता. बारामती, जि. पुणे), 2) भूषण बाळासो मुटेकर (रा. माळेगांव ता. बारामती, जि. पुणे), 3) गणेश मल्हारी चव्हाण (रा. ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे), 4) इसाक उर्फ मायकल हुसेन शेख (रा. कार्वेनाका- कराड, ता. कराड जि. सातारा) यांचे विरुदध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. वरील सर्व आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता, दिनांक 09/07/2023 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मुंबई संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, शरद नरळे सहा. दु. निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सागर साबळे, सचिन खाडे, जवान भिमराव माळी, अजित रसाळ, सागर आवळे, अरुण जाधव, किरण जंगम, आबासाहेब जानकर, आप्पासो काळे, अजित घाडगे, उवेश देशमुख, राणी काळोखे यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण हे करीत आहेत.