कोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराज्यविदर्भशैक्षणिक
BREAKING : दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि 2 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
विद्यार्थ्यांना १. www.mahresult.nic.in २. http ://sscresult.mkcl.org 3. https://ssc.mahr esults.org.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल.
उद्या सकाळी 11 वाजता शिक्षण विभागाकडून पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जाईल. यामुळे आता महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होणार आहे.