सातारा जिल्ह्यातील 3 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणारे 5 जण तडीपार

सातारा | तालुक्यातील उंब्रज, तळबीड, बोरगाव पोलिस ठाणे हद्दीत विहिरीमधील गणेश कांबळे मोटर (विद्युत पंप) चोरणाऱ्या पाच इलेक्ट्रिक जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी पोलिस उपअधीक्षक समीर शेख यांनी हद्दपार केले आहे. गणेश कांबळे (वय- 29), गणेश चव्हाण (वय- 20), अभय चव्हाण (वय- 21), अप्पा सातपुते (वय- 20, चौघेही रा. पेरले), सद्दाम अहमद (वय- 29, रा. काशीळ, मूळगाव मोहबाजार, उत्तर प्रदेश) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत.
पाचही जण नदीवरील इलेक्ट्रिक मोटारींची चोरी करत होते. त्यांच्यावर तसे गुन्हे दाखल असल्याने उंब्रज पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी त्या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे दिली होता. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी प्रस्तावाची चौकशी केली होती. त्यातील टोळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व नदीवरील इलेक्ट्रिक मोटार चोरत होते. त्यामुळे सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यात त्यांना अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई झाली. मात्र, त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही.
त्यांनी गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसल्याने त्यांना हद्दपार करण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यानुसार त्यांच्या दाखल प्रस्तावावर समीर शेख यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानुसार त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार प्राधिकरणासमोर अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, फौजदार मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.