पुणे- बेंगलोर महामार्गावर उभ्या ट्रक / टेम्पोमधून डिझेल चोरणारी टोळी गजाआड : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी। वैभव बोडके
सातारा जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या माल वाहतूकीच्या वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या चाैघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या चोरीत वापरलेले वाहन, मोबाईल हॅन्डसेट आणि चोरी केलेले डिझेल असा 4 लाख 51 हजार 560 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात करण जगदिश निर्मल (वय- 29 वर्षे रा. गणेश सोसायटी, जुगाव वाशी सेक्टर नंबर 11 नवी मुंबई), राशिद जावेद खान (वय- 28 वर्षे, रा. पितांबर अपार्टमेंट, जुगाव वाशी सेक्टर नंबर 11 नवी मुंबई), धिरज नरेंद्र वर्मा (वय- 22 वर्ष, रा. कोपरखेरणा, बोनकोवडे, सेक्टर नंबर 12 नवी मुंबई), समीम साहेबमियाँ हुसेन (वय- 19 वर्षे, रा. 509 दाखिलभाई नेरूळ गाव राममंदिर जवळ नवी मुंबई) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी,पाचवड गावच्या हद्दीत पुणे ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 चे सव्हिसरोडवर मारुती सुझुकी स्विफ्ट क्रमांक (एम. एच. 43. ए. एन. 7791) मधून काहीजण महामार्गावर जाणाऱ्या वाहनांना थांबवून डिझेल खरेदी करावयाचे आहे काय? असे विचारत होते. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्याच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून स्विफ्ट कार व संशयितांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या डिझेलच्या कॅनबाबत विचारपूस केली असता त्यांनी कॅनमधील डिझेल त्यांनी भुईंज गावच्या हद्दीतील प्रतापगड ढाब्याचे समोर उभ्या असलेल्या टेम्पोमधून चोरी करुन विक्री करण्याकरीता आणले असल्याचे सांगितले. तसेच 2 महिन्यापुर्वी शिरवळ येथून उभ्या असलेल्या डंपरमधून देखील डिझेल चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली. सदरील आरोपींच्याकडून डिझेल चोरी करण्याकरीता वापरलेले वाहन, चोरी केले डिझेल, मोबाईल हॅन्डसेट असा मिळून एकूण 4 लाख 51 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सातारा जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण?(हँलो न्यूज पोल- 2024)
खालील फेसबुक लिंकवर आपलं मत नोंदवा
https://www.facebook.com/groups/1728379947631362/permalink/1728397130962977/?mibextid=Nif5oz
खालील युट्यूब लिंकवर आपलं मत नोंदवा
https://youtube.com/@vishal_patil?si=4-CsPL6XqCuJ1wFN
पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद चेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, सचिन ससाणे, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केली.