तुमच्या हातात सत्ता, चाैकशी करा : शरद पवार यांचे इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतून थेट आव्हान

मुंबई | पंतप्रधानांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळा या दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. माझा आग्रह पंतप्रधानांना जिथे सत्तेचा गैरवापर झाला, अशी माहिती त्यांच्याकडे असेल. तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजासमोर ठेवावी. केवळ आरोप करण्यात अर्थ नाही, तुमच्या हातात सत्ता आहे. तेव्हा चौकशी करा आणि संपूर्ण देशाला सांगा वस्तुस्थिती काय आहे, असे थेट आव्हान इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
मुंबईत भाजपा विरोधी गटाच्या इंडिया आघाडीची बैठक उद्या 31 ऑगस्टला होणार आहे. या बैठकीत 28 राजकीय पक्ष भाग घेणार आहेत. शरद पवार यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी भाग घेतील. विरोधी आघाडीची ही बैठक मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये होणार आहे. यापूर्वीच्या दोन बैठका पाटणा आणि बंगळुरु येथे झाली होती.राष्ट्रवादीतील काही सहकारी बाजूला गेले आहेत. आजही काही सहकारी तुमच्या सोबत असले तरी ते भाजप सोबत असल्याचा संभ्रम आहे. यावर शरद पवार म्हणाले, कोणताही संभ्रम नाही. या राज्यातील मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील याची स्पष्टता आमच्या हितचिंतकांच्या मध्ये आहे.
एक दिवस गॅस फ्री मध्ये होईल
गेल्या 10 वर्ष लूट केली, आता निवडणुका आल्या असल्याने सामान्य आणि मध्यम वर्गीयाच्या तोंडावर 200 रूपये फेकले असते. तसेच इंडियाचा दोन बैठकीमध्ये देशात दोनशे रुपये स्वस्त गॅस झाला, असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. तर इंडियाच्या बैठकांमुळे एक दिवस गॅसवर असलेले महायुतीचे सरकार एक दिवस फ्री मध्ये गॅस देईल, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.