कृषीकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसांगलीसातारा

महिला नेत्या कोण- कोणत्या लाॅजवर असं राजकारण महाराष्ट्रान पाहिल नाही : शेतकरी नेते रघुनाथ पाटील

राजकर्ते नालायक आणि टाकाऊ स्वरूपाचे

कराड | आजच्या राजकारणात नेते आणि महिला नेत्या या एकमेकांची धुणी धुवत आहेत, कोण- कोणत्या लाॅजवर गेल्या हे राज्यपातळीवरीले नेते काढत असतील. तर असल्या हरामखोरांकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या. टीव्ही फोडावा कि बंद करावा अशा पध्दतीची परिस्थिती झालेली आहे. मंत्रालय म्हणजे एकमेकांची धुणी धुवायचा घाट झालेला आहे. एकमेकांची लक्तरे काढत असून कमरेखालील वार सुरू आहेत. महिला नेत्यांही एकमेकांची उणीधुणी काढत असन मर्यादा राहिली नाही, असे राजकारण यापूर्वी महाराष्ट्राने कधी पाहिले नाही. राजकर्ते नालायक आणि टाकाऊ स्वरूपाचे झालेले आहेत, असा हल्लाबोल सरकारवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला.

कराड येथील तहसिल कार्यालया समोर ऊसाला एफआरपी अधिक 500 रूपये भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष वसिम इनामदार यांनी गेल्या 6 दिवसापासून आंदोलन सुरू असून याठिकाणी शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी सरकारवर रघुनाथ दादा यांनी सडकून टीका केली असून राजकारणातील महिलांवरील टीकेवरून राजकारण्यांचा चांगलाच समाचार घेतला.

आंदोलन आवरणं सरकारला अवघड होईल : रघनाथ पाटील
शासन नेहमीच गेड्याच्या कातडीच असतं, त्याला धक्का द्यायची गरज आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहिल, या आंदोलनाची तीव्रता वाढलेली दिसेल. कराड येथील प्रशासनाने अजून दखल घेतली नसली तर आम्ही शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. सरकारने अनेक आश्वासने देत सत्तेत आलेले आहे. शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंन दिवस वाढत आहेत. तरीही सरकारचे डोळे उघडत नसतील, तर अजून प्रखर आंदोलन करू. तेव्हा सरकारला हे आंदोलन आवरणं अवघड होईल, असा इशाराही शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker