गणेशोत्सवात मंडळांनी काय करावे अन् काय नाही याबाबत पोलिस निरीक्षक विजय पाटील म्हणाले…
विंग व कोळे येथे सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक

कराड | गणेशोत्सवात सोशल मिडियावर मेसेज हातळताना काळजी घ्या. समाज माध्यमावर तेढ निर्माण होईल, असे अक्षेपार्ह मेसेज पाठवू नका. असे आवाहन विंग व कोळे येथे झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीत कराड तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक विजय पाटील यांनी केले. कोळे पोलीस ठाणे अंतर्गत विंग अणि विभागात कोळे येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत श्री. पाटील बोलत होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र महाडीक, विठ्ठल खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सरपंच शुभांगीताई खबाले, सदस्य विठ्ठल राऊत, बाबुराव खबाले, पोलीस पाटील रमेश खबाले, तंटामुक्ती अध्यक्ष संपत खबाले, विकास होगले, प्रियांका कणसे, कोळे येथील बैठकीत सरपंच भाग्यश्री देसाई, सुधीर कांबळे, पोलीस पाटील प्रिया देशमुख व ग्रामपंचायत सदस्य याच्यांसह सार्वजनीक गणेश मंडळाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष व सदस्य बैठकीस उपस्थीत होते. विंग हॅाटेल परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उदघाटन प्रारंभी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, यंदा पाऊस खूपच कमी आहे. मुर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी कमीत कमी उंचीच्या मुर्तीला पंसती द्या. घरगुती पध्दतीने साधेपणाने अणि शांततेत गणेशोत्सव साजरा करा. मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसवा. देणगीसाठी कोणावर जबरदस्ती करू नका. पोलीस प्रशासनाच्या सुचनाचे पालन करा. सर्व मंडळानी पोलीस विभागाकडे ऑनलाईन- ऑफलाईन नोंदणी करावी. धर्मादाय आयुक्ताची परवानगी घ्या. मुर्ती प्रतिष्ठापना खाजगी जागेत असेल तर त्या जागा मालकाची परवानगी घ्या. सार्वजनीक जागेसाठी ग्रामपंचायत परवाना घ्या. ठरलेल्या वेळेत मुर्ती विसर्जन करा. ध्वनीक्षेपण यंत्रेणेच्या आवाजावर मर्यादा ठेवा. पारंपारिक वाद्याचा वापर करा. जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा असे ते म्हणाले. तुमचे गाव मोठे आहे. गावला सामाजीक ऐक्य अणि धार्मीक परंपरेचा वारसा आहे. तो तुम्ही जपा. अशा अवश्यक सुचना बैठकीत उपस्थीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. बाबुराव खबाले यांनी प्रास्तावीक केले.