Rain News : सातारा जिल्ह्यातील 3 धरणांतून पाणी सोडले, कोयनेत पाऊस वाढला

सातारा- कोयना धरणात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोयना धरणात 95.79 टीएमसी पाणीसाठी साठला आहे. पाण्याची मोठी आवक होत असल्याने कोयना नदीत पाणीपातळी वाढ होवू लागली आहे. कोयना- 146 मिली , नवजा- 152 मिली आणि महाबळेश्वर येथे 145 मिली गेल्या चोवीस तासात पावसाची नोंद झाली आहे.
धोम बलकवडी धरणातून रात्री पाणी सोडले
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे पाण्यात वाढ होत असल्याने रात्री 10.00 वा. धोम बलकवडी धरणाच्या सांडव्यावरून वक्रव्दार क्र. 1 व 3 हे 0.25 मी. वरून 0.50 मी व द्वार क्र 2 हे 0.15 मी ने उघडून एकूण 2 हजार 782 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धोम धरणाच्या जलाशयात सोडण्यात आलेला आहे. धोम- बलकवडी धरणातील पाण्यातील विसर्गात वाढ /घट होऊ शकते.
धरणाच्या खालील कृष्णा नदीच्या पात्राजवळील बलकवडी/ परतवाडी/ दह्याट बोरगाव व इतर सर्व गावातील नागरिकांना पुढील सुचना प्राप्त होईपर्यंत सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा जनावरे पाण्यात सोडू नयेत.
वीर धरणातून 55 हजार पाण्याचा विसर्ग
भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या सांडाव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे विसर्गात वाढ झाली असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाचे प्रमाण वाढ होत आहे. त्यामुळे निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ५५, १९७ क्युसेक्स असणार आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
विद्युतगृहातून 450 क्युसेसचा विसर्ग
उरमोडी धरणात पाणी आवक व पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उरमोडी धरणातून दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ७:०० वा. उरमोडी नदीमध्ये विद्युतगृह मार्गे 450 क्युसेक विसर्ग सुरू करणेत येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा सांडव्याद्वारे विसर्ग सुरू होऊ शकतो.