आ. अतुलबाबा भोसलेंचा पाठपुरावा : मलकापूरच्या जिल्हा मार्ग क्र. 55 वरील कामांना सुरूवात

मलकापूर :- मलकापूर शहरात भारत पेट्रोलियम तर्फे जिल्हा मार्ग क्र.55 च्या (ढेबेवाडी फाटा ते गणेश काॅलनी) दोन्ही बाजुला पीएनजी गॅसची पाईप व मलकापूर नगरपरिषद 24×7 वितरण पाईप लाईन नलिका टाकणेचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तेव्हा या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे व रम्बलर पट्टे बसविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सदरच्या कामासाठी आमदार डाॅ. अतुल भोसले यांनी पाठपुराव्याने आणि सुचनेवरून सुरूवात झाल्याने मलकापूर वासियांनी धन्यवाद दिले आहेत.
सदर कामी मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, सभापती बांधकाम समिती हणमंतराव जाधव, नियोजन सभापती सुरज शेवाळे, सार्व. आरोग्य शिक्षण व वैद्यक सभापती धनंजय येडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती गितांजली पाटील, उपसभापती नंदा साठे, सर्व नगरसेवक /नगरसेविका, मुख्याधिकारी कपिल जगताप, नगरअभियंता योगेश गुरव, अभिराज डिंगणे, वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे यांचे सहकार्य लाभले.
मलकापूर शहरातील खालील ठिकाणच्या कामांना सुरूवात
1) दत्त मंदिर, बागलवस्ती, 2)दत्त शिवम हौसिंग सोसायटी, 3)अयोध्यानगरी, नुतन मराठी प्राथमिक शाळा, 4)जि.प. कॉलनी /बालाजी कॉलनी, 5)झोपडपट्टी / पोळ वस्ती, 6)हनुमाननगर / पवार वस्ती 7)गणेश कॉलनी /जाधव वस्ती, 8)शिवदर्शन कॉलनी, 9)कोपलँड कंपनी /पोळ पाणंद रस्ता या ठिकाणी रम्बलर पट्टे व दिशादर्शक फलक बसविणे आवश्यक होते.
सदरची कामे तातडीने करणेसाठी मलकापूर नगरपरिषदेने दि.14/05/2026 रोजी व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दि.14/05/2026 चे पत्र मा.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण), सातारा यांना दिले होते. त्यानुसार दि.17/07/2026 पासून सदरचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळणेस तसेच नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सुरक्षात्मक काम होणार आहे.



