कोयना दूध संघ : चेअरमनपदी लक्ष्मणराव देसाई तर व्हा. चेअरमनपदी शिवाजीराव जाधव बिनविरोध

कराड । विशाल वामनराव पाटील
माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील काका यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असणाऱ्या कोयना दूध संघाच्या चेअरमनपदी लक्ष्मणराव देसाई (सर) तर व्हॉइस चेअरमनपदी शिवाजीराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराडचे सहाय्यक उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले.
राज्यात सहकारी तत्त्वावर सर्वात प्रथम स्थापन झालेला कोयना दूध संघ होय. युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. त्यानंतर आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी लक्ष्मणराव देसाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यास संचालक तानाजी शेवाळे यांनी अनुमोदन दिले होते. तर व्हाईस चेअरमन पदासाठी शिवाजीराव जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यास संचालक दीपक पिसाळ यांनी अनुमोदन दिले होते. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने चेअरमन पदी लक्ष्मणराव देसाई सर व व्हाईस चेअरमनपदी शिवाजीराव जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते उदयसिंह पाटील, महानंदचे संचालक वसंतराव जगदाळे, प्रा. धनाजी काटकर, रयत कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब गरुड, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, माजी चेअरमन हनमंतराव चव्हाण, माजी सभापती प्रदीप पाटील, संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, माझी उपाध्यक्ष बाबुराव धोकटे, संचालक शिवाजी शिंदे,सुदाम चव्हाण आदीसह सर्व संचालक तसेच कोयना बँक, खरेदी विक्री संघ, रयत कारखाना, बाजार समिती आधी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चैअरमन यांचे संघाचे कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, कोयना दूध सेवक संघटना, कोयना मध्यवर्ती दुग्धालय सेवक सहकारी संस्था यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सत्कार करून अभिनंदन केले. आमचे नेते ऍड उदयसिंह पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित चेअरमन लक्ष्मणराव देसाई सर वाईस चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिली.