वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचायला पिढीला वेळ नाही : पी. एम. पवार
तांबवे फाटा- साकुर्डी येथे पुस्तकांचा फराळ प्रदर्शन
अभयकुमार देशमुख म्हणाले, भगवद्गीता आणि रामायण यांनी कुटुंबातील एकसंधता आजही जिवंत ठेवली आहे. आजच्या पिढीला वैचारिक विचार मिळण्यासाठी पुस्तकांची गरज आहे. ग्रामीण भागात पुस्तक प्रदर्शन ही संकल्पना राबवणे म्हणजे वैचारिक बैठक निर्माण करणे आणि पुढील पिढी विचारशील बनवणे यासाठी टाकलेले पाऊल आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीकांत बाबर यांनी केले. आभार मुख्याध्यापक आबासो साठे यांनी मांडले.
पुस्तक भिशी संकल्पना
प्रदर्शनात छोट्या मुलांसह मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन ठेवण्यात आले. तसेच नामवंत साहित्यिकांची पुस्तके त्याबरोबर मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, विज्ञान प्रयोगांची, कोड्यांची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रदर्शनातून वार्षिक सभासद नोंदणी 1000 रुपये केल्यास वर्षभरात आवडीची पुस्तके वाचण्यास मिळणार आहेत. त्यासोबत पुस्तक भिशी उपक्रम राबविण्यात आला आहे. महिना ठराविक रक्कम भरायचे आणि वर्षाच्या शेवटी त्याच्यावर 50 टक्के रक्कम वाढवून त्या किंमतीची पुस्तके खरेदी करता येणार आहेत.